
नांदगाव,( प्रतिनिधी )न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथे नांदगाव येथ महाराष्ट्राचे लाडके नेते मा. उपमुख्यमंत्री स्व. अजित दादा पवार यांची जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष या. श्री.व्ही वाय काकळीज सर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. काळे जे आर पर्यवेक्षक श्री.अविनाश शेवाळे ज्येष्ठ शिक्षक पगार, देशमुख व्ही एस दुकळे ए व्ही असल्याने भिलोरेडी एम सोनवणे बी ए व व्ही.डी कवडे तासकर मॅडम केदारे मॅडम अहिरे मॅडम आधी उपस्थित होते.
(याप्रसंगी बोलताना मुख्याध्यापिका श्रीमती जे.आर.काळे म्हणाल्या की माननीय श्री अजित दादांसारखा लोकनेते त्यांच्या कार्यामुळे ओळखले जातात .शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तम जाण असणारे सर्वसामान्यांना आपला आधार वाटायचे तसेच, कष्टकरी, श्रमजीवी, युवक ,विद्यार्थी समाजातील सर्व स्तरांमध्ये त्यांनी आपल्या कार्यामुळे आदराचे स्थान मिळवले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. व्ही. वाय.काकळीज सर यांनी स्वर्गीय अजित दादांच्या जीवनातील विविध प्रसंग व त्यांचे नांदगावकरांशी असलेले प्रेम यासंबंधी मत व्यक्त करून स्वर्गीय अजितदादांना आदरांजली समर्पित केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आर. ए कवडे यांनी केले. आभार प्रदर्शन डि.एम भिलोरे यांनी केले.

