
लासलगाव,(प्रतिनिधी ) दि.२३ जुलै: येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, प्रा.किशोर गोसावी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे यांच्यासह उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच याप्रसंगी प्रा.रामसिंग वळवी यांनी देखील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला उजाळा देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन केले. तसेच देशासाठी केलेले कार्य कौतुकास्पद असून अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनीही त्यांचे गुण अंगीकृत करावे. असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

