
इस्लापूर |( प्रतिनिधी) : दिल्ली येथील जंतर मंतर येथे 20 जुलै रोजीविद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी चार्ज च्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला इस्लापूर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवत बंदमध्ये सहभाग नोंदवला. तसेच विद्यार्थी कृती समिती व डी.वाय.एफ.आय.च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सद्भावना रॅलीत विद्यार्थी व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

सद्भावना रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून झाली. विविध घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली काढण्यात आली. फॉरेस्ट नाका, इस्लापूर येथे रॅलीचा समारोप झाला.
रॅलीदरम्यान सहभागी विद्यार्थी व युवकांनी “धर्मेंद्र प्रधान इस्तीफा द्या”, “तानाशाही नहीं चलेंगी”, “दिल्ली पोलीस मुर्दाबाद” अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला. रॅली शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.बी जाधवर यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता त्यावेळी वंचित बहुजन आघाडी जेष्ठ नेते दत्ता गडलवाड जगदीप हानवते सर्कल प्रमुख गौरव संजय कदम सिद्धार्थ घुगे ह्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या..
यावेळी स्टालिन आडे, इरफान पठाण (शिवणी), प्रशांत जाधव, बॅंटी आडे, दिनेश आडे, शिवम राठोड, श्रीनिवास आडे, अविनाश चव्हाण, तोफीक पटेल, संदीप शेळके, सोहेल खान, इरफान पठाण (इस्लापूर), ऐजास शेख यांच्यासह विद्यार्थी व युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

