
वासोळ :- इंदिरा माध्यमिक विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व चंद्रशेखर आझाद यांचा जन्मदिवस साजरा करतांना
वासोळ:- येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या इंदिरा माध्यमिक विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व चंद्रशेखर आझाद यांचा जन्मदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.केदार एस.एस.हे होते. सुरवातीला विद्यार्थ्यांची भाषणे झाली व नंतर श्री. निकम एस.के.यांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळकांविषयी माहीती सांगितली. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण झाले.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक वृंदांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री.आहेर एस.सी. यांनी केले.

