
नांदगाव (वार्ताहार )
आषाढी एकादशी निमित्त
आज दिनांक 24 जुलै 2026 रोजी विद्यार्थ्यांची शैक्षणिक पंढरीची वारी विठुरायाच्या दर्शनाला निघाली.
आज आषाढी एकादशी कार्यक्रमास उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक श्री लक्ष्मण ठाकरे सर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री. काकळीज व्ही वाय, ज्येष्ठ शिक्षक श्री मधे भास्कर शिक्षक प्रतिनिधी सौ सुनिता देवरे. प्रमुख वक्ते श्री ए. पी सोनवणे सर उपस्थित होते इ ५ व ७ वी अ वर्गाच्या विद्यार्थ्यांनी .

विठ्ठल रुक्मिणी वेशभूषेतून. भक्ती गीतातून विठ्ठलाचे दर्शन घडविले इ. ६ व ७ वी अ च्या विद्यार्थिनींच्या जयघोषाने शाळा विठ्ठल भक्तीरसात दुमदुमून निघाली.
वर्ग म्हणजे तुमचे पंढरपूर आहे
पुस्तक म्हणजे तुमची ज्ञानेश्वरी आहे
शिक्षक म्हणजे तुमचे संत आहे
विठ्ठल म्हणजे तुमचे ध्येय आहे
तुमचे परिश्रम म्हणजे तुमची वारी आहे
या शब्दात पंढरीच्या वारीचे वर्णन व दर्शन प्रमुख वक्त्यांनी केले नियोजनपूर्वक रोज अभ्यास केला संस्कार जपले तर जीवनात विठ्ठल नक्की भेटेल अशा शब्दात आषाढी महा एकादशीचे महत्व सांगितले पंढरपुरातील विठ्ठल भक्ती, रिंगण सोहळा,वारकऱ्यांची वारी,याविषयी प्रत्येकाच्या मनात पंढरपूर व विठ्ठल उभा करणारे आजचे प्रमुख वक्ते श्री ए पी सोनवणे सर यांनी शाळेचे वातावरण विठ्ठल मय करून विठ्ठल भक्तीत शिक्षक विद्यार्थी भारावून गेले.
अशाप्रकारे विद्यार्थिनींनी शैक्षणिक पंढरीची वारी विठुरायाच्या दर्शनाला काढली विठ्ठलाच्या भक्तिरसात .
जयघोषात शाळा दुमदुमून निघाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वेदिका पाटील हिने केले तर आभार वेदिका बच्छाव हिने व्यक्त केले
त्यांना मार्गदर्शन श्रीमती चव्हाण यांनी केले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली .

