
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३४३ वा दिवस

भारतात आपल्यावर नेहमीच राजांनी राज्य केले आहे. आणि राजांनी सर्व कायदे तयार केले आहेत. आता ते राजे गेले व याबाबतीत मार्ग दाखवणारे कोणी राहिली नाही. सरकार काही करणार नाही कारण त्याला लोकमताचा कल पाहून आपले धोरण ठरवावे लागते. प्रभावी दृढ असे लोकमत तयार होण्यास मोठा कालावधी लागतो, असे लोकमत तयार झाल्यावर मगच लोक स्वतःचे प्रश्न सोडवू शकतील. तोवर आपल्याला थांबावे लागेल. म्हणून सामाजिक सुधारणेच्या सर्व प्रश्नांचे स्वरूप हे असे आहे, सुधारणा हवी असणारे लोक कुठे आहेत? त्यांना प्रथम तयार करा. अल्पसंख्यांक लोकांचा जुलूम हा जगातील सर्वात भयंकर असा जुलूम आहे. दोषांची जाणीव मूठभर लोकांनाच झाल्याने सर्व राष्ट्र क्रियाशील होणार नाही. आपले राष्ट्र क्रियाशील का नाही? प्रथम राष्ट्र सुरक्षित करा. कायदे बनवू शकतील असे लोक तयार करा, मग कायदे आपोआप बनतील.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर श्रावण ४ शके १९४८
★ आषाढ शुध्द /शुक्ल १२
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ रविवार दि. २६ जुलै २०२६
★ १९५६ इजिप्तच्या सुएज कालव्याचे राष्ट्रीयीकरण
★२००५ मुंबई व उपनगरात २४ तासात ९९५ मिमी. विक्रमी पाऊस झाल्याने महापूर येथून शेकडो लोकांचा बळी गेला होता.
★ १९९९ ऑपरेशन विजय कारगिल विजयदिन
★ सर्व वीर हुतात्म्यांना श्रध्दांजली. “जय हिंद”

