
नाशिक :(प्रतिनिधी ) स्वामी विवेकानंद सोसायटी, नाशिक संचलित श्रीमान टी. जे. चौहान (बिटको) माध्यमिक विद्यालय, मोरवाडी सिडको येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून इयत्ता पाचवीसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उज्वला माळी , पर्यवेक्षक श्री. डी. बी. अहिरे सर उपस्थित होते. तसेच श्री. विनायक नवसुपे सर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
“गुरूंचे स्थान”, “माझ्या आयुष्यातील गुरू” आणि “गुरू-शिष्य परंपरा” या विषयांवर लहानग्यांनी आपले विचार मांडले. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आयुष्यात झालेला बदल विद्यार्थ्यांनी आपल्या शब्दांतून मांडत गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांचा आत्मविश्वास आणि भाषाशैली उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरली.
मार्गदर्शन करताना मुख्याध्यापिका सौ. माळी म्हणाल्या, “शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणारे शिल्पकार आहेत. त्यांना दिलेला आदर आणि त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता हीच खरी गुरुदक्षिणा आहे.”
स्पर्धेचे निकाल
प्रथम क्रमांक : अथर्व अभिमान पाटील
द्वितीय क्रमांक : अर्णव रतन खरात
तृतीय क्रमांक : अनन्या अशोक पाटील
उत्तेजनार्थ : वेदांत संदीप राजगुरू
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

