
निसर्गवासी कारभारी मुक्ताजी साबळे गुरुजी बाबा हे मूळचे हिवरे गावचे त्यांचे बालपण पहिली ते चौथी हिवरे येथे गेले नंतर शाळा सोडून कुंभाळणे तालुका अकोला येथे आजी व वडिलांबरोबर वास्तव्य केले शेती केली वडिलांना वाजेला त्यांच्या कामात मदत केली व पुढे शिक्षणात खंड पडला त्यानंतर एक दिवस त्यांचे गुरुजी भेटले त्यांनी विचारले अरे तू शाळा का सोडलीस शाळेत जा पूर्वी शिक्षण घे त्यांनी नंतर शिक्षणासाठी सिन्नर गाठले

सिन्नर मधील एक समाज बांधव व आप्तेष्ट यांच्याकडे राहून पाचवी ते सातवी पर्यंतचे शिक्षण अत्यंत गरीब परिस्थितीत व प्रसंगी उपाशी पोटी राहून पूर्ण केले नंतर जिल्हा परिषद शिक्षक म्हणून चौगाव तालुका बागलाण येथे ऑर्डर मिळाली व एक वर्ष नोकरी पूर्ण झाल्यानंतर ट्रेनिंग साठी निवड झाली आणि त्यानंतर त्यांचा जीवनप्रवास सुरू झाला. सहचारींनी म्हणून भागीरथीबाई कानडे यांच्याशी विवाह झाला पगार अत्यंत तुकडा महिना 50 ते 60 रुपये त्यामध्ये आई वडील चुलते भावंडे बहिणी भाचे यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचे त्यांचा प्रवास असाच चालू असताना सिन्नर तालुक्यात बदली झाली त्यानंतर खऱ्या अर्थाने ते कुटुंबाकडे लक्ष देऊ शकले त्यांनी जीवनात शिस्तीला फार महत्त्व दिले प्रत्येक गोष्ट काटेकोर नियमशीर वेळेत त्यांच्या अंगावर आणि पडले होते नोकरी शिस्तप्रिय प्रामाणिकपणा होताच त्यांच्या कारकिर्दीत अनेक विद्यार्थी घडले काही ऑफिसर झाले तर काही चांगल्या ठिकाणी नोकरीस व कामधंद्यास लागले ते आजही त्यांची आवर्जून आठवण काढतात आम्ही गुरुजींमुळे आज ह्या स्तरापर्यंत पोहोचलो त्यांच्या कुटुंबात तीन मुले दोन मुली असा परिवार आहे मोठा मुलगा अरुण डॉक्टर आहे दुसरा मुलगा प्रभाकर बँक मॅनेजर आणि तिसरा मुलगा अनिल कमर्शियल आर्टिस्ट आहे सध्या अविष्कार फोटो व्यवसायात कार्यरत आहेमोठी मुलगी सुमन त्यावेळची सातवी पास आहे आणि लहानी मुलगी पुष्पा ग्रॅज्युएट असून त्या विवाहित आहेत
नोकरीत सतत बदल्या होत्या सिन्नर तालुक्यातील वावी गोटेवाडी गोंदे दोडी कुंदेवाडी कोळगाव माळ भटवाडी शहापंचाळे आणि शेवटी डुबेरवाडी येथे १९८९ मध्ये मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले त्यांनी वयाचे 38 वर्षे शिक्षण क्षेत्रात सेवा केली. सेवेत असताना सर्व सहकारी शिक्षक बंधूंचे संबंध नेहमी चांगले व सलोख्याचे होते कधीही कोण कोणाचाही रागवत द्वेष मनामध्ये बाळगला नाही तसेच सामाजिक कार्याची सुद्धा आवड होती नेहमी कोणाच्याही मदतीला धावून जाणे हे त्यांच्या स्वभावातच होते समाजात श्री तुपे सर स्वर्गीय रामहरी आहेर गुरुजी स्वर्गीय खंडेराव जाधव गुरुजी व इतर सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या बरोबरीने नेहमी कार्यरत होते
निसर्गवासी कारभारी साबळे गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली🌹🙏
शब्दांकन महामित्र परिवार

