
नांदगाव -दि 7ऑगस्ट 2026
नांदगाव येथील जे.टी कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कुल व सौ.क.मा कासलीवाल माध्यमिक व प्राथमिक विद्यालय येथे स्व. माणिकचंदजी कासलीवाल यांचा 26 वा भावांजली समारोह संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन समिती चे अध्यक्ष तानाजी शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विशाल सावंत यांनी करताना स्व.माणिकचंदजी कासलीवाल यांच्या कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. तसेच प्रिन्सिपल मनी चावला सर यांनी देखील स्वर्गीय माणिकचंद कासलीवाल यांच्या आठवणींना उजाळा दिला.

याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून,तसेच नृत्य व समूहगीतातून स्वर्गीय माणिकचंदजी कासलीवाल यांच्या पवित्र स्मृतींना आदरांजली वाहिली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरख डफाळ यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना माणिकचंदजी कासलीवाल यांनी नि:स्वार्थी भावनेने सामाजिक कार्य केले. तसेच त्यांनी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक ,व्यापार अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवून मिळालेल्या संधीचे सोने केले.जीवनात ज्यांचा आदर्श घ्यावा असे थोर परीस रुपी व्यक्तिमत्व नांदगावच्या भूमीला लाभले हे आपले भाग्यच आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.त्यांच्या धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याच्या आठवणी जाग्या केल्या.
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला.वडिलांच्या आशीर्वादानेच त्यांचा शैक्षणिक व सामाजिक बांधिलकीचा वारसा समर्थपणे पुढे सुरू राहिल असे आश्वासन दिले.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन समिती चे अध्यक्ष तानाजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांसमोर विविध चमत्कारांचे प्रात्यक्षिक करून त्यामागील वैज्ञानिक कारणे उलगडून सांगितली. तसेच अंधश्रद्धेपासून दूर राहून वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन समिती चे अध्यक्ष तानाजी शिंदे, पोपट चव्हाण,संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल ,संस्थेचे उपाध्यक्ष सुशीलकुमार कासलीवाल,सचिव -विजय चोपडा,सहसचिव प्रमिलाताई कासलीवाल,विश्वस्त रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, आनंदभाऊ कासलीवाल, संजीवकुमार कासलीवाल, अंकुर कासलीवाल तसेच प्रतिक कासलीवाल,पुष्पा चांदिवाल, कुणाल कासलीवाल ,प्रिन्सिपल मनी चावला,मुख्याध्यापक गोरख डफाळ,विशाल सावंत तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅरलीन जोसेफ यांनी तर संजय शिवदे यांनी आभार व्यक्त केले.

