
चेअरमन:- सौ. वर्षा संजय आहेर

व्हाईस चेअरमन:- श्री.नारायण जयराम आहेर
नांदगाव: तालुक्यातील हिसवळ खुर्द येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीत चेअरमनपदी सौ. वर्षा संजय आहेर व व्हाईस चेअरमनपदी श्री. नारायण जयराम आहेर यांची बिनविरोध निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी श्री. विजय उगलमुगले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली काल नांदगाव येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात दुपारी 11 वाजता संस्थेची बैठक झाली.
चेअरमन पदासाठी सौ. वर्षा संजय आहेर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यावर सूचक श्री. विजय पंढरीनाथ आहेर व अनुमोदक श्री. संतोष बाबुराव आहेर यांच्या स्वाक्षरी होत्या.
व्हाईस चेअरमन पदासाठी श्री. नारायण जयराम आहेर यांचा अर्ज दाखल झाला. त्यावर सूचक श्री. मोहन एकनाथ आहेर व अनुमोदक श्री. तुळशीराम पुंजाबा सदगीर यांच्या स्वाक्षरी होत्या.
प्रत्येकी एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दोन्ही पदे बिनविरोध झाल्याचे घोषित केले.
यावेळी संचालक मंडळातील डॉ. विजय कदम, श्री. मोहन दादा आहेर, श्री. संतोष आहेर, श्री. विजय आहेर, सौ. शीलाताई आहेर, श्री. विश्वास आहेर, श्री. प्रशांत आहेर, श्री. सोजेराव बिन्नर, श्री. पांडुरंग दैने, श्री. तुळशीराम सदगीर यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.
निवडीनंतर आमदार सुहास अण्णा कांदे यांचे वतीने नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन श्री. प्रमोद भाबड यांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
याप्रसंगी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अंकुश कातकडे, श्री. श्रावण बोगिर, सरपंच कैलास फुलमाळी, मा. चेअरमन विलास आहेर, श्री सुरेश आहेर,श्री. दशरथ आहेर, श्री संभाजी आहेर, श्री भरत आहेर, श्री नानासाहेब आहेर, श्री राजेंद्र आहेर, श्री संतोष आहेर, श्री. बाजीराव आहेर, श्री सुदाम आहेर, श्री मनोहर आहेर, श्री सागर आहेर, श्री रमेश आहेर, श्री कैलास आहेर, श्री किशोर आहेर, श्री शुभम आहेर, श्री प्रकाश नाना आहेर, श्री रितेश आहेर, श्री आप्पासाहेब काळे, श्री योगेश आहेर, श्री.शिवाजी आहेर सौ भाग्यश्री मोरे, निर्मलाताई सोनवणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

