
नाशिकरोड:( प्रतिनिधी)- पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) अभियानांतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या ‘घरोघरी तिरंगा अभियानां’तर्गत विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण पगार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भास्कर सानप आणि सर्व शिक्षक-कर्मचारी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांची परिसरात तिरंगा रॅली काढण्यात आली. भारतीय तिरंगी ध्वजाचा इतिहास, ध्वजाचे महत्त्व आणि ध्वजसंहिता याबद्दल शिक्षकांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी ‘हर घर तिरंगा… घर घर तिरंगा’ अशा घोषणा देत परिसरात चैतन्य निर्माण केले.

