
मा.श्री विश्वासराव मोरे (उपाध्यक्ष मविप्र समाज नाशिक )यांच्या हस्ते ध्वजारोहण…..
पिंपळगाव बसवंत–* येथील मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे कर्मवीर गणपत दादा मोरे जनता विद्यालय पिंपळगाव बसवंत येथे 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रमुख अतिथी म. वि. प्र. समाज संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. विश्वासराव मोरे साहेब, तसेच शालेय समिती अध्यक्ष मा.. श्री. जयराम मोरे, सर्व समित्यांचे उपाध्यक्ष, सचिव, सदस्य यांचे मुख्याध्यापक श्री. थेटे एस. जी यांनी विद्यालयाच्या वतीने स्वागत केले .
राष्ट्रध्वजाचे ध्वजपूजन,व ध्वजारोहण मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री विश्वासराव मोरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजपूजन व ध्वजारोहण शालेय समिती सदस्य मा श्री उल्हासराव मोरे सर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमासाठी व्यासपीठावर शालेय समिती अध्यक्ष जयराम मोरे, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलचे शालेय समिती अध्यक्ष संदीप भवर ,गीतेश बनकर राजेंद्र बनकर, साहेबराव देशमाने, शैला मोरे, रोहिणी पाटील, डॉ योगिता भांबर , साहेबराव आथरे, तिन्ही ज्ञान संकुलाचे सर्व शालेय समिती सदस्य
सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गांगुर्डे, गुड्डूभाई सैय्यद, चंदनभाऊ सुरळकर,सागरजी बोराडे तसेच शालेय विविध समित्यांचे अध्यक्ष सर्व सदस्य विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस.जी थेटे, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका शिल्पा धारराव, अभिनव बालविकास मंदिर च्या मुख्याध्यापिका स्वप्नाली जाधव , ज्येष्ठ शिक्षिका वंदना कदम उपस्थित होते.
विद्यालयाचा गीतमंच यांनी राष्ट्रगीत, राज्यगीत,ध्वजगीत, देशभक्तीपर गीत सादर केले.क्रीडा शिक्षक संदीप गडाख यांनी तीन कौमी नारे देत विद्यार्थ्यांनी जय च्या घोषणा देत शालेय परिसर दुमदुमला होता.
स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांनी स्वतंत्र सेनानी, वीर जवान, राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषा कार्यक्रमाचं आकर्षण ठरलं सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गांगुर्डे, गुड्डूभाई सैय्यद, चंदनभाऊ सुरळकर,सागरजी बोराडे यांनी गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग शूज, गणवेश दिले यांचे वाटप गरजू विद्यार्थ्यांना करण्यात आले.
आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले. शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार अतिशय सुरेख सराव पुर्ण संगितमय कवायत क्रीडा शिक्षक संदीप गडाख, उगले मॅडम यांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतली. कॉपीमुक्त अभियानांतर्गत दहावीच्या विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. स्वातंत्र्य दिनी विद्यालयात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
उपस्थित सर्वांना मा.श्री विश्वासराव मोरे साहेब यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे फलक लेखन गायखे मॅडम यांनी केले.सुत्रसंचालन श्रीम निकम व्ही.यु यांनी केले .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परीश्रम घेतले.

