
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३१५ वा दिवस
वाढदिवस
राज्यशास्त्र विषयाचे गाढे अभ्यासक स्वामी विवेकानंद यांच्या विचिराने प्रभावीत झालेले आणि स्वामी विवेकानंदांचे विचार आपल्या वाणीतून व लेखणीतून प्रसारीत करणारे शिवाय सातत्यपूर्ण अखंड ३३१५ आज पर्यंत विवेक विचारातून दिन विशेष देणारे आदरणीय प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे सर यांना गणतंत्र न्युज, नांदगाव तसेच राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक परिषदे तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कार्य छोटे असो किंवा मोठे असो त्यात सातत्य, (Consistency) नियमीतता,(Regularity) प्रामाणिकपणा (Honesty) असेल तर ते अधिक परिणामकारक होते. कोणतेही कार्य करीत असतांना आपल्या ध्येयाविषयी तुमच्या हृदयात उत्कट निष्ठा असली पाहिजे, ती क्षणिक असता कामा नये. आदर्शाविषयीची ही निष्ठा सतत टिकणारी, सतत प्रयत्नशील व अचंचल असायला हवी. विजांचा कडकडाट व मेघांचा गडगडाट चालू असता आकाशाकडे डोळे लावून बसणाऱ्या आणि मेघांतून पडलेल्या पाण्यावाचून दुसरे कोणतेही पाणी न पिणाऱ्या चातकाप्रमाणे ही निष्ठा अटल असली पाहिजे. आयुष्यात यशाचे शिखर गाठण्यासाठी आणि महान कार्यासाठी 'उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.' हाच मूलमंत्र आपल्या जीवनात यशाची आणि समाधानाची गुरुकिल्ली आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय आषाढ ७ शके १९४८
★ जेष्ठ शुध्द /शुक्ल १४
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ रविवार दि. २८ जून २०२६
★ १९२१ भारताचे नववे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचा जन्मदिन.
✍️विवेकानंदांचे जाज्वल्य, प्रेरणादायी व अनुकरणीय असे मनुष्य निर्माणाचे व राष्ट्राच्या पुनरुत्थानाचे विचार नियमित व अखंडितपणे गत नऊ वर्षांपासून (३१ मे २०१७) पासून आपल्या पर्यंत पोहचविण्याचा संकल्प आज माझ्या ‘जन्मदिनी’ पूर्णत्वास जात आहे. या सातत्यपूर्ण उपक्रमाचा आज ३३१५ वा दिवस असून, हे वैचारिक अग्नीहोत्र असेच सतत तेवत रहावे यासाठी ठाकूरांच्या, स्वामीजींच्या चरणी प्रार्थना व आपल्या सर्वांच्या, सदिच्छा व शुभाशिर्वादाची माफक अपेक्षा.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे 9921976422

