
नाशिक जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ गायकर यांजकडुन –—- रात्री बेरात्री वीज पुरवठा बंद करणे , व तो कितीही वेळ. किती वेळाचे भारनियमन आहे ? वेळापत्रक काय आहे ? असे विचारले तर चक्क वरिष्ठ आधिकार्याचें आदेश आहे कि कुठलीही पुर्वसुचना न देता आणि किती वेळ याचीही माहिती न देता कधीही वीजपुरवठा खंडित केला जाऊ शकतो व तो पण अनिश्चित काल.असे मनमानी पद्धतीने उत्तरे वीज वितरण चे आधिकारी, कर्मचारी देत असुन नागरिकामध्ये संताप व्यक्त केला जातो आहे. कुठलेही वेळापत्रक निश्चित न करता रात्री, अपरात्री वीज घालवणे व ती ही किती वेळ हे ही अनिश्चित हा सगळा तर हुकुमशाही कारभार झाला. वीज मिळणे हा ग्राहकाचा हक्क आहे.आणि त्या बाबतची सुचना, पुर्वसुचमा देणे वीज वितरण ला बंधनकारक आहे असे असतानां ग्राहकानां खिजगणतीत ही न धरता उडवा उडवीची उत्तरे देणे हा तर अनागोंदी कारभाराचा कळसच म्हणायला हवा. दुसरीकडे शहरी भागात मात्र अत्यंत सुरळीत वीजपुरवठा व ग्रामीण भागात कधीही वीजपुरवठा खंडित करणे हयाचा नेमका अर्थ काय ? ग्रामीण भागात माणसे रहात नाहीत का ? असा संतापजनक सवाल नागरीक करत आहेत.

