
खेडले झुंगे येथील योगीराज तुकाराम बाबा गुरुकुलात बालकवींना गौरविताना सिन्नर साहित्य भारतीचे मान्यवर.
सिन्नर (प्रतिनिधी )योगीराज तुकाराम बाबा गुरुकुल खेडले झुंगे व साहित्य भारती सिन्नर यांच्या संयुक्त विद्यामाने विद्यार्थ्यांच्या कविताच्या सरींनी रंगली वर्षा ऋतू सहल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक कवी किरण भावसार यांनी “कविता कवीच्या हृदयाची व अंतर्मनाची परिभाषा असते ” असे म्हटले. यावेळी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक पद्धतीने मान्यवरांचे औक्षण व ढोल व लेझीमच्या तालावर स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती पूजनाने व कवीने साकारलेले’ काव्यमय पुस्तक ‘ विद्यार्थी कवी स्वरचित कवितांच्या पूजनाने झाली. यावेळी विद्यार्थी स्वरचित ‘ योग्यांचे ते योगीराज, तुकाराम बाबा योगीराज ‘ हे गीत सांस्कृतिक मंचाने सादर केले. गुरुकुल मधील इयत्ता पाचवी ते नववीच्या वर्गातील जवळपास 40 विद्यार्थ्यांनी निसर्ग, पाऊस, आई वडील,मित्र, शाळा, पर्यावरण विषयांवर कविता करून उस्फूर्त सहभाग नोंदविला. या काव्य स्पर्धेत पहिल्या तीन कवितांच्या कवींना व बालकवींना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

तसेच सहभागी सर्वच कवींना साहित्य भारतीतर्फे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या ग्रंथालयास वृक्षमित्र विष्णू वाघ लिखित ‘निपेऱ्या ‘,’ कवी किरण भावसार लिखित ‘एक होता ढगुला, संजय पवार लिखित ‘ कुणब्याची गाथा ही पुस्तके प्रधान केली.’यावेळी कवी मोहन वाकचौरे यांनी विद्यालयातील उपक्रमांना 1000/-ची देणगी दिली. यावेळी विद्यालयातील मयुरी सूर्यवंशी व आकांक्षा नागरे या शिक्षकांनीही स्वरचित कविता सादर केल्या. विद्यार्थी कवींच्या कवितेचे परीक्षण डॉ.राजेंद्र कमानकर व डॉ.
दीपक श्रीमाळी यांनी केले. यावेळी सिन्नर साहित्य भारतीचे साहित्यिक कवी किरण भावसार, गुरुकुलचे संस्थापक रवींद्र गोर्डे, साहित्यिक गोविंद मोरे, प्रा.संजय पवार, पत्रकार राजेंद्र अंकार,वृक्षमित्र विष्णू वाघ, प्रा प्रभाकर चतुर, मोहन वाकचौरे,देवा थोरात,योगेश थोरात, सुनिताताई वाळुंज,ललिताताई गोसावी, दिपाली भावसार, वैशाली वाघ, कीर्तीताई अंकर, सपना श्रीमाळी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी पूनम रुकारी, रोशनी वाघ यांनी, स्वागत गीताची सुंदर प्रस्तुती स्वर संवादिनी म्युझिकल ग्रुपच्या विद्यार्थिनींनी केले तसेच मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा या मैत्री गीताचे सादरीकरण ओंकार गोसावी व आयुष्य घुमरे यांनी केले. यावेळी नवोदित विद्यार्थी कवींनी साहित्यिकांच्या मुलाखती घेतल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुकुलचे संस्थापक रवींद्र गोर्डे यांनी तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापिका योगिता गवळी यांनी मानले.

