
सिन्नर ( प्रतिनिधी )सिन्नर साहित्य भारती व नवोदय निराधार पुनर्वसन केंद्र मेंढी यांच्या संयुक्त विद्यामाने व्यसनमुक्ती केंद्रातील बांधवांना नवी जगण्याची उर्मी, जगण्याची नवी अशा पल्लवीत व्हावी या हेतूने सिन्नर साहित्य भारतीच्या नवोदित कवींच्या “रिमझिम काव्य मैफिली”तून नवोदय पुनर्वसन केंद्रातील बांधवांना नव्या जगण्याची उर्मी मिळावी यासाठी केंद्राचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते मधुकर गीते व ज्येष्ठ साहित्यिक कवी किरण भावसार यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.मुख्याध्यापक गोविंद मोरे सरांनी त्यांच्या कवितेतून नवोदय केंद्रातील बांधवांना त्यांच्या जीवनात आनंदाचे व प्रसन्नतेचे नवीन टॉनिक भरले तर संस्थापक मधुकर गीते व कवी किरण भावसार यांनी सांगितले की ही साहित्यिकांची रिमझिम काव्य मैफिल केंद्रातील बांधवांमध्ये नवीन आशेची पालवी, जगण्याची नवीन उमेद व सकारात्मकता निर्माण करेल यात शंका नाही असे प्रतिपादन केले. तसेच पुनर्वसन केंद्र चालविताना येणाऱ्या अडचणी, व केंद्राची यशस्वी होणारी वाटचाल याचा आढावा घेतला. या समाजभिमुख कार्यक्रमात सिन्नर साहित्य भारतीचे मार्गदर्शक कवी किरण भावसार, मा. मुख्याध्यापक गोविंद मोरे, पत्रकार राजेंद्र अंकार, सत्यजित कळवणकर,प्रा. संजय पवार, वृक्षमित्र विष्णू वाघ, डॉ प्रशांत गाडे, डॉ राजेंद्र कमानकर, डॉ दीपक माळी, प्रा.प्रभाकर चतुर , कवी मोहन वाकचौरे, कवी भरत शिंदे, कवी देवा थोरात, कवी योगेश थोरात, कवियत्री सुनिता ताई वाळुंज, कवयित्री ललिताताई गोसावी आधी कवींनी त्यांच्या कवितेतून निसर्ग, श्रावण, पाऊस, माणूसपण, आई-वडिलांच्या प्रति आदराची भावना हे विषय घेऊन त्यांच्या जीवनात सकारात्मक विचारांची पेरणी केली. यावेळी नवोदय पुनर्वसन केंद्रातील काही बांधवांनी केंद्राविषयी अतिशय आपुलकी व आदराचे भावना व्यक्त केली. यावेळी सर्व साहित्यिक व प्रमुख पाहुण्यांचा नवोदय पुनर्वसन केंद्रातर्फे यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सौ.गीतेताई व गीते परिवार, कीर्तीताई ओंकार, दिपाली ताई भावसार,ॲड. समता श्रीमाळी, वैशालीताई वाघ केंद्राचे पदाधिकारी, कर्मचारी व व्यसनमुक्ती शिबिरार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.राजेंद्र कमांकर, प्रास्ताविक प्रा. प्रभाकर चतुर व आभार वृक्षमित्र विष्णू वाघ सर यांनी मानले.

