
वाचडगाव येथे मविप्रच्या शैक्षणिक वाटचालीतील ऐतिहासिक पर्वाला प्रारंभ
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाजाच्या (मविप्र) इतिहासातील एक अभिमानास्पद आणि सुवर्णक्षण ठरणाऱ्या कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, वाचडगाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक यांच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री महोदय, पालकमंत्री, मंत्रीमहोदय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार कृषी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या या महाविद्यालयाच्या नूतन वास्तूमुळे शिक्षणाच्या नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे.
हा कार्यक्रम केवळ एका इमारतीच्या उद्घाटनापुरता मर्यादित नसून शेतकऱ्यांच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, ग्रामीण शिक्षणाच्या विकासासाठी आणि मविप्रच्या ११४ वर्षांच्या ज्ञानयज्ञातील एका महत्त्वपूर्ण अध्यायाची सुरुवात आहे.
या वास्तूच्या उभारणीत विश्वास, सहकार्य, योगदान आणि देणगीच्या माध्यमातून मोलाची साथ देणारे सर्व सभासद, देणगीदार, हितचिंतक व शिक्षणप्रेमी बांधवांचा सहभाग या ऐतिहासिक क्षणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
मविप्रचे सभासद हे संस्थेच्या प्रगतीचे आधारस्तंभ असून त्यांच्या प्रेम, सहकार्य आणि योगदानामुळेच संस्थेची शैक्षणिक वाटचाल सातत्याने पुढे जात आहे. त्यामुळे वेळेअभावी स्वतंत्र निमंत्रण देता आले नसले तरी हे निमंत्रण आपुलकीचे समजून सर्वांनी या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संचालक दिंडोरी–पेठ प्रवीण एकनाथ जाधव यांनी केले आहे.
स्थळ : कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, वाचडगाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक
दिनांक : शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६
वेळ : सकाळी ११.०० वाजता
मविप्रच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील कृषी शिक्षणाच्या नव्या वाटचालीला बळ देण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

