
‘अस्मिता खेलो इंडिया’अंतर्गत रग्बी स्पर्धेचे उद् घाटन संपन्न
नाशिक:- रग्बी खेळात असलेल्या चापल्य, धाडस आणि शारीरिक क्षमतेची कसोटी लागते. त्यामुळे उत्कृष्ट खेळाडू निर्माण होतो. त्यासाठी मैदानावर सतत कार्यरत रहा. विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्यासाठी मैदानावरील खेळासोबत मैत्री करणे, ही उत्तम गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ क्रिडाशिक्षक आणि माजी प्राचार्य राजेंद्र सोमवंशी यांनी केले.
महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय आणि नाशिक जिल्हा रग्बी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात 'अस्मिता खेलो इंडिया'अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय रग्बी स्पर्धेचे उद् घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
रग्बी असोसिएशनचे अध्यक्ष संजय चव्हाण सर आणि सेक्रेटरी मनोज कनोजिया यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेत १५ वर्षे वयोगटातील मुलींच्या १२ संघांनी तसेच १२ वर्षे वयोगटातील ८ संघांनी सहभाग घेतला. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक सेनेचे सरचिटणीस विनोद हिरे, दिव्यांग अधिकारी-कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, बाळकृष्ण घोलप, पुनीत आवटे, विनायक खैरनार, प्रतीक कडाळे, रिजवान शेख, अमोल शिंदे, राजेंद्र यशवंते, कृष्णराव शिंदे, अशोक बोराडे आदी उपस्थित होते. स्पर्धा प्रमुख म्हणून ईश्वर (मुंबई) आणि पंकज (ठाणे) तसेच नाशिक जिल्हा रग्बी असोसिएशनचे सेक्रेटरी मनोज कनोजिया, मुख्याध्यापक अनिल ढोकणे, राम धोंगडे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि पंच यांनी काम पाहिले.

