लेखक– प्रा.जावेद शेख,सिन्नर
– गोंदेश्वर मंदिर दर्शन
8329839434

सिन्नरच्या ऐतिहासिक व स्थापत्यवैभवाचा अमूल्य ठेवा असलेल्या गोंदेश्वर मंदिराला मा. नामदार गिरीशभाऊ महाजन
(जल संपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री, कुंभमेळा मंत्री तथा पालकमंत्री, नाशिक)
यांनी भेट देऊन दर्शन घेतले.
सह्याद्री युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे नेते मा. उदयभाऊ सांगळे यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने या विशेष गोंदेश्वर मंदिर दर्शनाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी गोंदेश्वर मंदिराचा इतिहास, स्थापत्यशैली, शिल्पवैभव आणि पंचायतन संकल्पना यांची माहिती देण्यात आली. तसेच 🍃‘गोंदेश्वर मंदिर दर्शन’🍃 हे पुस्तक मा. गिरीशभाऊ महाजन यांना सप्रेम भेट देण्यात आले.
🏛️ गोंदेश्वर मंदिराचे संवर्धन, भाविकांसाठी मूलभूत सुविधा, धार्मिक पर्यटनाला चालना आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिन्नरच्या ऐतिहासिक परिसराचा जलद विकास व्हावा, यासाठी मा. उदयभाऊ सांगळे यांनी शासनाकडे आग्रह व्यक्त केला.
या प्रसंगी गोंदेश्वर मंदिर सेवा समितीच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले. भक्तिमय वातावरणात झालेल्या या महाआरतीला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मंदिरप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोंदेश्वर केवळ मंदिर नाही…
तो सिन्नरच्या वैभवशाली इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे!
वारसा जपूया…
संवर्धन करूया…
आणि जगभर पोहोचवूया!
मा. उदयभाऊ सांगळे यांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद!

