
नाशिक रोड (प्रतिनिधी)महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नाशिकरोड आयोजित सुप्रसिद्ध “संवाद सृजनाशी” कार्यक्रम मालिकेचे ४०वे पुष्प लेखक, संपादक, व्याख्याते प्रा.बाळकृष्ण अंजनगावकर (पागेरे) शनिवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता, ऋतुरंग सभागृह, दत्त मंदिर चौक, नाशिकरोड येथे गुंफणार आहेत. प्रा.अंजनगावकर महानुभाव पंथातील विचारवंत म्हणून परिचित आहेत. त्यांचे विविध ग्रंथ प्रकाशित आहेत. गेल्या अनेक दशकांपासून जिल्हास्तरीय चक्रधर स्वामी जयंती उत्सवाचे संस्थात्मक कार्यवाह म्हणून आयोजनात सक्रिय आहेत. अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

शाखेचे उपाध्यक्ष कवी रवींद्र मालुंजकर यांच्या अध्यक्षतेखाली होणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून त्यास जास्तीत जास्त साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष उन्मेष गायधनी, प्रमुख कार्यवाह शिवाजी म्हस्के, कार्यवाह रेखा पाटील, प्रशांत केंदळे, हर्षल भामरे, दिनेश पैठणकर, कामिनी तनपुरे, सुरेखा गणोरे, सुमन हिरे, प्रशांत कापसे, रामचंद्र शिंदे आदींनी केले आहे.

