
नांदगाव : ( प्रतिनिधी ) नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्व. मिश्रीलाल भिकचंद छाजेड विद्यालय, नांदगाव येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम शाळेच्या मुख्या. सौ. सुनिता जाधव मॅडम, शाळेचे अधीक्षक मा. भैयासाहेब चव्हाण सर, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा मा. सुवर्णा आहेर व उपस्थित सर्व माता पालक सदस्य यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले.डाँ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनपट विषयी श्री. पाटील सरांनी माहिती सांगितली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.जाधव मॅडम यांनी केले. त्याचबरोबर शाळेचे अधीक्षक श्री. चव्हाण सर यांनी गोष्टीतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यापन करणाऱ्या इ. चौथीच्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने कौतुक करण्यात आले.त्यांना महाले सर, खान्देशी मॅडम, जाधव सर, रोकडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद,बालमंदिर शिक्षिका, सेविका या सर्वांना माता पालक संघातर्फे गौरविण्यात आले.तसेच शिक्षणातील महत्त्वाची भूमिका याविषयी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच श्री. वाघ सर, नारळे सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जया बोंबले मॅडम यांनी केले. आभार श्रीम.आशा सोनवणे मॅडम यांनी मानले. सर्वांच्या सहकार्याने आजचा कार्यक्रम आनंद पार पडला.

