
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३८५ वा दिवस

गीतेत 'हृषीकेश' म्हणजेच इंद्रियांचे वा इंद्रिययुक्त जीवात्म्यांचे ईश्वर हे, 'गुडाकेशा'ला म्हणजेच निद्रेच्या अधीश्वराला वा निद्राजयी अर्जुनाला उपदेश देत आहेत. 'धर्मक्षेत्र' कुरुक्षेत्र म्हणजेच हे जग. पाच पांडव म्हणजेच धर्म. शंभर कौरवांशी म्हणजेच ज्या सर्व गोष्टींवर आपण आसक्त असतो नि ज्यांच्याशी आपला सतत विरोध निर्माण होत असतो त्यांच्याशी युद्ध करीत आहेत. पाच भावांमधे सर्वात शूर जो अर्जुन म्हणजेच प्रबुद्ध जीव तो त्यांचा नायक होता. आपल्याला समस्त इंद्रियसुखांशी ज्या साऱ्या वस्तूंवर आपण अत्यंत आसक्त आहोत त्यांच्याशी युद्ध करावयाचे आहे, त्यांना मारून टाकावयाचे आहे. आपण निःसंग होऊन उभे ठाकले पाहिजे. आपण स्वरूपतः ब्रह्म आहोत, आपल्या इतर सर्व भावना आपण ह्या एकाच भावनेत विलीन करून टाकल्या पाहिजेत तीतच डुबवून टाकल्या पाहिजेत.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर भाद्र नभस्यमास १५ शके १९४८
★ श्रावण वद्य /कृष्ण १०
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ रविवार दि. ६ सप्टेंबर २०२६
★ १८८९ थोर स्वातंत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार, काँग्रेस नेते, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे थोरले बंधू बॅरिस्टर शरदचंद्र बोस यांचा जन्मदिन.
★ १९२१ बार-कोड चे सहसंशोधक नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड यांचा जन्मदिन.

