
नादंगाव (वार्ताहार )
पालक-शिक्षक संघ (२०२६-२७) आणि विद्यार्थी प्रतिनिधींच्या संयुक्त विद्यमाने सकाळसत्र, दुपारसत्र व मुख्य औपचारिक सोहळ्याचे नेटके नियोजन करण्यात आले होते.
सकाळ आणि दुपार अशा दोन्हीसत्रांतील विद्यार्थ्यांनी शाळा व्यवस्थापन आणि अध्यापनाचे कामकाज अत्यंत कौशल्याने व उत्साहाने सांभाळले.

विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी:
👑 मुख्याध्यापिका: कु. मृण्मयी दंडगव्हाळ
🎖️ उपमुख्याध्यापिका: कु. ईश्वरी जानराव
📋 पर्यवेक्षक : कुमार संकेत थोरे
विद्यार्थी शिक्षकांचे मनोगत व भाषणे:
🎤 कु. भक्ति सानप, कु. आरती खाडे, कु. मृणाल बोरसे, कु. वैष्णवी परदेशी व कु. कोमल राऊत यांनी अध्यापनाचा अनुभव व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
सूत्रसंचालन : कु. गिरिजा वाघमारे हिने केले. व्यासपीठावरील विशेष उपस्थिती:

अकॅ बोर्ड सदस्य श्री. गुलाब पाटील,श्री. भास्कर मधे,सौ. रूपाली झोडगेकर व श्री. मुकुंद बागुल यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शाळेच्या शिक्षिक प्रतिनिधी सौ. सुनीता व श्री. सुरेश नवसारे आणि ज्येष्ठ शिक्षक मा. श्री. विलास काकळीज उपस्थित होते.
मुख्यकार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील विद्यार्थिनींनी अत्यंत मधुर आवाजात स्वागत गीत सादर करून उपस्थित मान्यवरांचे व उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक : पा .शिक्षक संघ सदस्य श्री. सुधाकर निकम यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची पार्श्वभूमी मांडली.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन परिचय: उपाध्यक्ष श्री. धनंजय काळे यांनी यांच्या जीवनचरित्रावर व शिक्षण क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकला.

विद्यार्थी मनोगत* :ओम महाजन (१० ‘ई’) व कुमारी प्रज्ञा जाधव (१० ‘क’) यांनी शिक्षकांविषयी आदर व्यक्त केला.
शिक्षक मनोगत* : श्री. रवींद्र ठाकरे यांनी विद्यार्थी-शिक्षकांच्या पाठ निरीक्षणाचा अहवाल व आपले मनोगत मांडले.
विशेष मनोगत: सदस्या सौ. आशा पाटील यांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमादरम्यान पालक-शिक्षक संघाच्या सर्व सन्माननीय सदस्यांच्या वतीने शाळेतील सर्व शिक्षकांना भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल विशेष आभार मानण्यात आले व त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. अध्यक्षीय भाषण* : शाळेचे मुख्याध्यापक श्री. लक्ष्मीकांत ठाकरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षकांचे समाजघडणीतील योगदान आणि विद्यार्थ्यांच्या शिस्तीवर मार्गदर्शन केले. .शि. संघ सदस्या सौ. भारती बोरसे यांनी सूत्रसंचालन केले.सौ.. सई वाघ यांनी उपस्थितांचे व कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.

