
सिन्नर ( प्रतिनिधी) आद्य क्रांतीवीर उमाजी राजे नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की
०७ सप्टेंबर या दिवशी आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांची जयंती.आद्य क्रांतीवीर उमाजी राजे नाईक यांनी ब्रिटिशांविरूध्द सावकारशाही विरूद्ध सशस्त्र बंड उभारून जनतेला न्याय देण्याचं काम केलं.आद्यक्रांतिकारक असलेले उमाजी राजे नाईक,राघोजी भांगरे,भागोजी नाईक हे समकालिन क्रांतिकारक होते.त्यांनी जनतेची पिळवणुक करणा-या जुल्मी अत्याचारी इंग्रज राजवट, सावकार,जमिनदार,वतनदार यांच्याविरूध्द बंड पुकारले होते.उमाजी राजे नाईक यांनी जनतेचे शोषन करणा-यांना लुटून गोरगरीबांना आर्थिक मदत करत होते.कोणत्याही स्रीवर अन्याय अत्याचार झाल्यास ते त्या विरूध्द लढा देत होते.

देशाला परकियांच्या गुलामगिरीतुन मुक्त करण्यासाठी त्यांनी ब्रिटीशांना सळो की पळो करून सोडले. लोक त्यांना प्रती शिवाजी महाराज म्हणु लागले. पुढे फंद-फितुरीमुळे उमाजी राजेंना पकडले गेले. त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवण्यात आला व त्यांना दोषी ठरवुन ३ फेब्रुवारी १८३२ ला फाशी देण्यात आले.अशा या आद्यक्रांतीवीरास विनम्र अभिवादन!
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश शिरसाट यांनी केले व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले तर आभार राजेंद्र बेंडकुळे यांनी मांडले
यावेळी , महामित्र दत्ता वायचळे राघोजी ब्रिगेडचे संस्थापक रामुदादा इदे, सहसंस्थापक विजय मुठे,राजेंद्र बेंडकुळे,प्रकाश शिरसाठ संदिप मुठे आकाश धोंगडे गोरख मुठे विलास कुलथे योगेश मोरे शरद जाधव मंगेश पिंपळे माऊली चांदणे सावळीराम दिवे रोहित मुठे, बंटी सातभाई शुभम मुठे आदि उपस्थित होते.

