
नाशिक:( प्रतिनिधी)-शिक्षक दिनाच्या निमित्ताने नाशिकमधील शिक्षकांनी हेमलकसा येथे पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांच्या समवेत अनोखा शिक्षक दिन साजरा केला.
लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून हेमलकसा भामरागड (गडचिरोली) या ठिकाणी महारोगी सेवा समिती वरोरा अंतर्गत दुर्गम भागातील माडिया गौंड समाजातील आदिवासी मुलांच्या आयुष्याला दिशा देणारं हे आश्रमशाळेचं रोपटे समाजसेवक पद्मश्री स्व.बाबा आमटे यांनी २३ डिसेंबर १९७३ साली लावलं होतं.
त्यानंतर पुढे ही जबाबदारी पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे व सौ.मंदा आमटे व परिवाराने सांभाळून अत्यंत निष्ठेने हे कार्य सुरू ठेवले.
एका झाडाखाली २५ विद्यार्थ्यांना घेऊन सुरू झालेल्या या निवासी आश्रमशाळेत बालवाडी ते १२ (कनिष्ठ महाविद्यालय ) जवळपास ५०० ते ६०० विद्यार्थी असून शाळेने सुवर्ण महोत्सवी ५० वर्ष पूर्ण केले आहेत. शिक्षक दिनाच्या निमित्ताने या आश्रमशाळेला भेट देण्याचा योग आला..
माजी प्राचार्य संजय चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
मुलांशी शिक्षकांशी छान गप्पा मारत….
बालसाहित्यिक राजेंद्र सोमवंशी यांनी शालेय शिक्षण विभागाने अभ्यासक्रमात समाविष्ट केलेली ” शाळेला छान छान बनवायचं…” ही कविता सादर केली तेव्हा मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद काही वेगळाच होता.
पद्मश्री डॉ प्रकाश आमटे यांच्या तपश्चर्येचे फळ म्हणजे आज शाळेतील शाळेतील अनेक मुले- मुली डॉक्टर,इंजिनीयर, शिक्षक,पोलीस, नर्स या क्षेत्रात कार्यरत आहेत.
५ सप्टेंबर २०२६ रोजी समाज शिक्षक पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे, डॉ.सौ मंदा आमटे व परिवाराची भेट घेतली व हेमलकसा येथील शाळेला दिलेल्या भेटीमुळे ख-या अर्थानं आमचा शिक्षकदिन साजरा झाल्याचा आनंद होतो आहे अशी भावना सर्वांनी व्यक्त केली. माजी प्राचार्य संजय चव्हाण यांचे शुभहस्ते स्मृती चिन्ह व शाल तसेच राजेंद्र सोमवंशी यांचे ” गम्माडी गम्मत” व ” गीत नवे गाऊ ” हे बालकांव्यसंग्रह भेट देऊन पद्मश्री डॉ प्रकाश आमटे व डॉ.सौ मंदा आमटे यांना सन्मानित करण्यात आले..
यावेळी शिक्षक शिक्षकेतर सेनेचे विभागीय अध्यक्ष संजय चव्हाण, जिल्हा अध्यक्ष मधुकर वाघ, सरचिटणीस कलीम अन्सारी तसेच,विनोद हिरे,राजेंद्र यशवंते,योगेश्वर मोजाड, विनोद पानसरे, बाळकृष्ण घोलप,योगेश रोकडे उपस्थित होते.

