
नाशिकरोड:-( प्रतिनिधी )पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात थोर शिक्षणतज्ज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन ‘शिक्षक दिन’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
ज्येष्ठ शिक्षक व्ही.ए.पाटील यांच्या हस्ते आणि विद्यार्थी, शिक्षक-कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन करण्यात आले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी वर्ग अध्यापनासह शालेय कामकाज उत्कृष्टपणे सांभाळले. शिक्षक दिनाच्या निमित्ताने मुख्याध्यापकपद सांभाळणारी विद्यार्थिनी मानसी आडके हिच्यासह तनिष्का भरसट, चंदन राठोड, सार्थक सानप, अथर्व सानप यांनी अनुभवकथन केले. ज्येष्ठ शिक्षक एस.बी.शिरसाठ यांनीही मार्गदर्शन केले. व्ही.ए.पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मौलिक विचार मांडले.
विद्यार्थ्यांच्या हस्ते सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. कल्याणी मोरे हिने प्रास्ताविक केले. रुचिका उगले हिने आभार मानले. श्रद्धा आडके हिने सूत्रसंचालन केले.

