
सिन्नर (प्रतिनिधी ) सिन्नरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले यांना छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने बाराव्या राष्ट्रीय अधिवेशनात राज्यस्तरीय छावा क्रांतिवीर गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले.
समाजहीत व राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून ज्या व्यक्ती आपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी आणि निस्वार्थी भावनेने सेवा करतात याची दखल घेत महाराष्ट्रातील ख्यातनाम छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांनी गेल्या सहा-सात महिन्यात सिन्नर नगर परिषदेच्या माध्यमातून केलेल्या कामाची नोंद घेतली .त्यांनी जनतेच्या पाण्यासाठी केलेली धावपळ, शहरातील रस्त्यांची विविध कामे ,गटारीची कामे ,तसेच विज पुरवठा अखंडित रहावा यासाठी केलेले प्रयत्न, नागरिकांच्या अडी अडचणीसाठी केलेली मदत , संकटकाळी वैद्यकीय सेवे साठी त्यांची धावपळ व मदत तसेच स्वतः कार्यालयात सकाळी 11 ते सायंकाळी सात आठ पर्यंत हजर राहून केलेली लोकहिताची कामे . या सर्व गोष्टी लक्षात घेऊन क्रांतिवीर संघटनेने त्यांना राज्यस्तरीय छावा क्रांतिवीर गौरव पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.
नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृहामध्ये हा सन्मानाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर छावा क्रांती सेनेचे अध्यक्ष करणजी गायकर , कार्यक्रमाचे अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे, उपमहापौर विलास शिंदे ,भाजप नेते सुनील बागुल, भाजपचे प्रवक्ते अर्जुन चव्हाण, ऍड. शिवाजी सहाणे ,सिन्नरचे नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले , नगरसेविका हर्षदा गायकर ,साधना मटाले, नितीन दातीर, हरिभाऊ बोडके, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमासाठी अनेक कामगार शेतकरी युवक तसेच राजाभाऊ चव्हाणके, वामनराव गाडे,उमेश गायकवाड,अनिल थोरात, मच्छिंद्र कडभाने, टायगर ग्रुप चे संस्थापक पप्पू गोडसे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आनंदा सालमुठे,बाळासाहेब ढोके, आदित्य उगलेअसे अनेक मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुरुवातीला शाहीर स्वप्निल डुंबरे यांच्या प्रबोधन पर शाहिरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करणजी गायकर यांनी केले. शेतकरी कामगारांच्या लढ्याला मराठा क्रांती योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी दूरध्वनी द्वारे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यानंतर सिन्नरचे नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले यांना राज्यस्तरीय छावा क्रांतिवीर गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे ,सुनील बागुल, उपमहापौर विलास शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर विठ्ठल राजे उगले यांनी हा पुरस्कार हा माझा वैयक्तिक नसून सिन्नरच्या मातीची नाळ जोडलेल्या प्रत्येकाचा असल्याचे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
या पुरस्काराने सिन्नर करांना अभिमान वाटावा असे कार्य सिन्नरचे लोक नियुक्त नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांच्या माध्यमातून होत असल्याची भावना सिन्नरकरांनी व्यक्त केली.

