
चापडगाव (प्रतिनिधी ) शेवगाव तालुक्यातील चापडगाव जिल्हा परिषद शाळेचे उपकमशील शिक्षक कवी गवाजी बळीद यांना सहकारी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुखी समृद्ध जीवनासाठी एक विद्यार्थी एक झाड ,पक्षांसाठी मूठभर दाणे वाटीभर पाणी, माझी परसबाग ,पर्यावरण संवर्धन ,वृक्षसंगोपन, व्यसनमुक्ती ,जलसाक्षरता, बालआनंदी बाजार ,शिक्षक कवी संमेलन, बालकवी संमेलन ,भाषिक काव्यकोडी ,विज्ञान काव्यकोडी, जो दिनांक तो पाढा ,मोबाईलला बाय पुस्तकाला हाय बालनाट्य लेखन ,प्रभावी संवादलेखन व दिग्दर्शन ,दिनविशेष काव्यलेखन ,समाज प्रबोधक काव्य निर्मिती व सादरीकरण आदि उपक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम , मातृभाषा संवर्धन, शैक्षणिक व काव्यलेखन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन भारत सरकारच्या एम सी ए अधिपत्याखालील मेक इन इंडिया निती आयोग विधि व न्याय पुरस्कृत “अॅचिव्हर अॅवार्ड कौन्सिल “या अधिकृत परिषदेच्या वतीने ” मानद डॉक्टरेट “पदवी नामांकनासाठी समितीमार्फत निवड झाली असून येत्या ऑगस्ट महिन्यात राजधानी दिल्ली येथे विधि व न्याय मंत्री मा अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित विशेष समारंभात कवी गवाजी बळीद यांना डॉक्टरेट पदवी बहाल करून सन्मानीत करण्यात येणार असल्याचे परिषदेच्या वतीने कळविण्यात आले आहे . नुकताच कवी गवाजी बळीद यांचा “दिनविशेष काव्यधारा ” हा बहुचर्चित व विद्यार्थी उपयोगी काव्यग्रंथ प्रकाशित झाला असून या यशाबद्दल कवी शिक्षक गवाजी बळीद यांचे मा गटविकास अधिकारी सोनल शहा मॅडम, गट शिक्षणाधिकारी शैलजा राऊळ मॅडम ,शिक्षण विस्तार अधिकारी डॉ .शंकर गाडेकर साहेब ,अधिव्याख्याता डॉ मुकुंद दहिफळे साहेब, जालींदर बटुळे साहेब सुदामजी बटुळे साहेब ,प्रा डॉ बाबुराव उपाध्ये , डॉ प्रज्ञा पवार ,डॉ. शिवाजी काळे, डॉ संगीताताई फासाटे ,प्रा राधाकिसन देवरे ,प्रा प्रशांत वाघ ,प्रा विठ्ठलराव सोनवणे ,प्रा चंद्रकांत कर्डक , पत्रकार डॉ बाळासाहेब कोठुळे ,प्रेमानंद बच्छाव , सूरज क्षेत्रे ,सुरेश घोक्षे , शरद चाबुकस्वार ,प्रा किसन चव्हाण ,प्राचार्य संपतराव दसपुते ,प्राचार्य सुरेश शेरे , शिक्षक बँकेचे संचालक मा रमेशजी गोरे ,केंद्र प्रमुख बबनराव ढाकणे ,रघुनाथ लबडे ,श्रीकृष्ण शेळके ,नामदेवराव धायतडक ,सोपानराव डांगे ,मुख्याध्यापक तुकाराम भगत ,सहकारी शिक्षक दादासाहेब चव्हाण, बाबासाहेब हरदास, रविंद्र घनवट ,मंजुश्री कारभारी नाचन – खंडागळे, पूनम राऊत – वाघमारे ,दत्ता सुरवसे सर्व शिक्षक विषयतज्ञ साधनव्यक्ती ,विषय शिक्षक यांचेसह चेअरमन कल्याणराव नेमाने ,सरपंच विठाताई नेमाने व सर्व सदस्य शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभय गोरे, उपाध्यक्ष कोमल दारूणकर यांचे सह सर्व सदस्य भारतशेठ लोहकरे ,माजी सरपंच शहादेव पातकळ , दत्तात्रय झेंड, सुधाकर सांगळे ,प्रा सुभाष विखे ,संजय दारूणकर ,डॉ बी एम ठोंबरे, अशोक पातकळ, रविंद्र लहासे ,नवनाथ गायकवाड उमेद वाचनालय बोधेगावचे सर्व उमेदियन्स मित्र परिवार आप्तेष्टासंह पंचक्रोशीतील नागरिक व विद्यार्थ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

