
भालूर (प्रतिनिधी) जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भालूर येथे आपल्या मातृसंस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर डी. आर. भोसले यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमास म. वि. प्र. समाज संस्थेचे आजीव सभासद श्री. जठार धनाजी महादू व त्यांचे सहकारी उपस्थित होते. तसेच उच्च माध्यमिक विभागाचे श्री. हिरे एस. के., श्री. पाटोळे एस. बी. व श्रीमती दौंड मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी इयत्ता अकरावी व बारावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कर्मवीर डी. आर. भोसले यांनी ग्रामीण व सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्यासाठी केलेल्या महान कार्याचे यावेळी स्मरण करण्यात आले. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी ज्ञान, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जोपासावी, असा संदेश देण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटी कर्मवीर डी. आर. भोसले यांच्या महान कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले.

