
लासलगाव, ( प्रतिनिधी ): येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (+२ स्तर) विभागाच्या वतीने केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनीही पत्रकारिता, ग्रंथ लेखन, वक्तृत्व, इतिहास संशोधन व प्रत्यक्ष कार्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन साधणारे श्रेष्ठ प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा.देवेंद्र भांडे, प्रा.सुनिल गायकर आणि सर्व रा.से.यो. स्वयंसेवकांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

