
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३९७ वा दिवस

उच्चतम सत्याचा जगात सर्वत्र प्रचार व प्रसार करा. कोणत्याही कारणाने सत्याशी थोडी देखील तडजोड करू नका. तुमचा मानसन्मान नष्ट होईल किंवा अप्रिय संघर्ष निर्माण होईल असे भय बाळगू नका. निश्चित जाणून असा की नाना प्रकारची प्रलोभने समोर असूनही जर तुम्ही सत्याला बांधील राहाल तर तुमच्या ठायी अशी दैवी शक्ती उत्पन्न होईल की जिच्यासमोर, तुम्ही ज्या गोष्टी सत्य मानीत नाही त्यांच्यासंबंधी तुमच्याशी बोलण्यास लोकांना भय वाटेल. सतत चौदा वर्षे तुम्ही जर कठोरपणे सत्याचे अखंड पालन करु शकला तर तुम्ही जे म्हणाल त्यावर लोक पूर्ण विश्वास ठेवतील.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर भाद्र नभस्यमास २७ शके १९४८
★ भाद्रपद शुध्द /शुक्ल ७
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शुक्रवार दि. १८ सप्टेंबर २०२६
★ जेष्ठा गौरी पूजन
★ २००२ साहित्यिक, मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांचा स्मृतीदिन.

