
नाशिकरोड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा नाशिकरोड यांच्या वतीने पंढरपूरच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ‘काव्य दिंडी’ या विषयावर आधारित खुले कविसंमेलन शनिवार, ११ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता ऋतुरंग सभागृह, दत्त मंदिर चौक, नाशिकरोड येथे आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला संतसाहित्याचे अभ्यासक श्री. रमेश वाघ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, वारीची परंपरा, वारकरी संप्रदायाची भक्ती, अध्यात्म आणि सांस्कृतिक वारसा यांचे काव्यमय दर्शन घडविणाऱ्या स्वलिखित कवितांचे सादरीकरण यावेळी होणार आहे.
कविसंमेलनात केवळ ‘वारी/दिंडी’ या विषयावरील स्वलिखित कविताच सादर केल्या जाणार आहेत. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवींनी कार्यकारिणी सदस्य श्री. प्रशांत केंदळे (८०८७१७२२४१) किंवा उपाध्यक्ष श्री. रवींद्र मालुंजकर (९४२३०९०५२६) यांच्याकडे पूर्वनोंदणी करणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, जास्तीत जास्त कवी, साहित्यिक आणि साहित्यरसिकांनी उपस्थित राहून ‘काव्य दिंडी’चा आनंद घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा नाशिकरोड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

