
करंजाड (प्रतिनिधी)
मविप्र संचलित कॉ.उदाराम तुळशिराम देवरे माध्यमिक विद्यालय करंजाड येथे जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री.धोंडगे सर यांनी भूषविले. सुरुवातीला गावातून प्रभात फेरी काढून जागतिक लोकसंख्या दिनाविषयी घोषणा देण्यात आल्या. विद्यार्थी मनोगत.कु पूजा देवरे,तनुजा भामरे,तनिष्का देवरे या विद्यार्थिनींनी भाषणे सादर केली. विद्यालयातील उपशिक्षक श्री. दिपक खैरनार व ज्येष्ठ शिक्षिका कुमावत मॅडम यांनी जागतिक लोकसंख्या वाढ व भविष्यकाळातील समस्या याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतात विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री.धोंडगे सर यांनी वाढत्या लोकसंख्येचे परिणाम,साधनांची उपलब्धता याबद्दल जनजागृती करणे हा यामागचा उद्देश आहे. असे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयातील उपशिक्षक श्री. तुषार बोरसे यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभल्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

