
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३३५ वा दिवस
विविधतेचा विनाश करून बाह्य विश्वात एकत्वाची स्थापना करणे हे नीतीचे कार्य कधीही नव्हते व पुढेही राहणार नाही, कारण हे असंभाव्य आहे व त्यामुळे विनाश व मृत्यू ओढवेल. बाह्य विश्वात जबरदस्तीने एकसारखेपणा किंवा एकत्व लादल्यास मानवी स्वातंत्र्याचा आणि वैविध्याचा विनाश होईल, ज्यामुळे केवळ अराजकता निर्माण होईल. पण नीतीचे ध्येय आहे विविधतेत एकत्व अनुभवणे, भीतिदायक परिस्थितीतही हृदयात ईश्वराची प्रचिती घेणे, बाह्यतः दुर्बलता दिसत असली तरी सर्वांच्या ठायी असलेली अनंत शक्ती ओळखणे आणि वरवर सर्व गोष्टी विपरीत दिसत असल्या तरी आत्म्याच्या अनंत, शाश्वत, स्वाभाविक शुद्धतेचा प्रत्यय घेणे. हेच आपल्याला जाणून घ्यावयाचे आहे. भारतीय मनोवृत्ती म्हणजेच वेदान्ती मनोवृत्ती विश्लेषणाभिमुख असल्यामुळे तिला विश्लेषणातून एकत्व गवसले आणि म्हणून तिने एकत्वाच्या तत्त्वावरच सर्व गोष्टी आधारित करण्याचा प्रयत्न केला.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर आषाढ २७ शके १९४८
★ आषाढ शुध्द /शुक्ल ५
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शनिवार दि. १८ जुलै २०२६
★ १९१८ महात्मा गांधींचे अनुयायी, दक्षिण आफ्रिकेचे कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला तथा मदीबा यांचा जन्मदिन.
★ १९६९ संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुरस्कर्ते, लेखक, कवी व समाजसुधारक लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा स्मृतीदिन.
★ २०१२ हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते, लोकसभा सदस्य, सुपरस्टार राजेश खन्ना यांचा स्मृतीदिन.

