
सिन्नर ( प्रतिनिधी)लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिनानिमित्त त्यांना शिवप्रेमी च्या वतीने सिन्नर येथे अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याची माहिती देताना म्हणाले की फक्त दीड दिवस शाळा शिकलेले अण्णाभाऊ साठे यांनी समाज हितासाठी अनेक कथा कादंबऱ्या नाटक व पोवाडे लिहिले त्यांची “फकीरा” ही कादंबरी अत्यंत प्रसिद्ध आहे, जी ब्रिटिश राजवटीतील दलित समाजाच्या शोषणाविरुद्ध लढणाऱ्या फकीराच्या कथेवर आधारित आहे. त्यांनी लोककलासाठी तमाशा, लावणी, आणि पोवाडे यांचा उपयोग सामाजिक प्रबोधनासाठी केला. त्यांनी “माझी मैना गावावर राहिली”, हे गाणं यांसारखे साहित्य लोकप्रिय झाले अण्णाभाऊ सुरुवातीला साम्यवादी विचारसरणीने प्रभावित होते आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया च्या सांस्कृतिक शाखा असलेल्या लाल बावटा मध्ये सक्रिय होते.
त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोलाचे योगदान दिले, त्यांनी मार्क्सवादी-आंबेडकरवादी विचार स्वीकारले आणि दलित युवक संघ स्थापन केला. त्यांनी जातीयवाद, मागसवर्गीय शोषण, आणि लैंगिक असमानता यांच्याविरुद्ध लढा दिला.
त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडे लिहिले, व रशियापर्यंत पोहोचले अशा महान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय मुठे यांनी केले व प्रास्ताविक डाॅ.आर टी जाधव यांनी केले तर आभार दिपक जाधव सर यांनी मानले
या कार्यक्रमासाठी उपस्थित महामित्र दत्ता वायचळे ,डॉ. आर. टी. जाधव,आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे प्रकाश माळी, दिपक जाधव सर, मनोज माळी अमोल शिंदे दर्शन भालेराव, राजेंद्र सातपुते ,शाम कुटे, राजेंद्र देशमुख, धनंजय परदेशी आदी उपस्थित होते

