
नाशिक (प्रतिनिधी ) गिरणा गौरव प्रतिष्ठान च्या पुस्तकावर बोलू काही या अभिनव उपक्रमात मंगळवार २१ जुलै रोजी दैनिक दिव्य मराठीच्या निवासी संपादिका जेष्ठ पत्रकार दीप्ती राऊत या कोरडी शेतं ओले डोळे या पुस्तकावर २८६ वे पुष्प गुफंणार आहेत.
महाराष्ट्राला गेली २५ वर्ष शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा प्रश्न भेडसावत आहे. सुरुवातीपासून आजपर्यंत अनेक बातम्या पासून तर विधिमंडळाच्या अधिवेशनापर्यंत रोजच्या राजकारणापासून ते निवडणुकांच्या राजकारणापर्यंत हा विषय आजही तसाच आहे.आजही आत्महत्या होत आहेत. या गंभीर समस्येची जाणारा जातो. पण मागे जे राहतात त्याचं काय? ही बाजूही तितकीच भीषण आहे. अनुभव आणि संवेदनशीलता जपत दीप्ती राऊत यांनी या प्रश्नाचा सखोल अभ्यास केला. महाराष्ट्रातल्या विविध दुष्काळी जिल्ह्यामध्ये जाऊन, तेथील महिलांशी त्यांनी संवाद साधला.तेथील परिस्थिती समजून घेतली. आत्महत्याग्रस्त झालेल्या कुटुंबाची झालेली वाताहात त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली. परिस्थिती पुढे हतबल झालेल्या अनेक अबला त्यांना भेटल्या आणि संकटाशी मुकाबला कसा करावा,त्यातून मार्ग कसा काढावा यावर मात करणाऱ्या अनेक योध्याही भेटल्या. रोजच हरणाऱ्या शेकडो शेतकरी विधवांची होरपळ यातून दुःखाला जिद्दीने सामोरे जाऊन लढणाऱ्या महिलांचे दुःख त्यांचे उदाहरण जगासमोर आणणारे हे पुस्तक आहे. कोरडी शेतं ओले डोळे. आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा… अंधारात असलेली एक सामाजिक समस्या या पुस्तकात असून, शेतकरी विधवांचे मेळावे घेतले या मेळाव्याला अनेक महिला मुलांच्या हातात हात धरून आलेल्या, तर कुणी आपल्या तान्ह्या बाळाला कडेवर घेऊन, कोणी विशीतल्या कोणी चाळीशीतल्या या सगळ्या जणीच्या डोळ्यातले भकास भाव सारखेच वाटतात. त्या महिलांच्या दुःखाच्या समस्या, संकट सारखेच यातून अंधारमय भविष्याचं आणि भयही सारखंच वाटते. पत्रकार म्हणून काम करताना, लोकांच्या प्रश्नावर वैशिष्ट्यपूर्ण वार्तांकन, ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून विविध समाज समूहाचे अंधारातील जगणे प्रकाशात आणण्याचे काम त्यांनी केले.शासकीय व्यवस्थेतील कच्चे दुवे मांडणे अशा विविध माध्यमातून दीप्ती राऊत यांनी आपल्या लेखणीला एक वेगळा आयाम प्राप्त करून दिला आहे नॅशनल टेलिव्हिजन अवार्ड, रामनाथ गोएका ॲवार्ड,म. टा गौरव सन्मान, वरूणराज भिडे उत्कृष्ट पत्रकार, गिरणा गौरव प्रतिष्ठानचा गिरणा गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्काराने त्या सन्मानित आहेत. धगधगती मुंबई हे त्यांचे भाषांतरित पुस्तकही प्रसिद्ध आहे. डोक्याचा पदर कमरेला खोचून जगण्याची लढाई जिंकणाऱ्या अशा अनेक आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा महिलांच्या अंधारातील जगणं शोधून त्याचा अभ्यास करून आत्महत्या आणि त्यानंतर, खंडीभर हिम्मत, लोकांच्या नजरा, दुहेरी संकट, आधाराच्या काड्या, प्रश्नाचा डोंगर, शासकीय उदासीनता, स्वयंसेवी आधार, उत्तराची किरणं, तगण्याची कारणं, अपेक्षा आणि आकांक्षा, निष्कर्ष आणि शिफारशी अशा अनेक प्रश्नांचा वापर या पुस्तकात असून कोरडी शतक ओले डोळे या विषयावर गप्पा ऐकण्यासाठी नक्की या मंगळवार २१ जुलै २०२६ सायंकाळी ६ वाजता हुतात्मा स्मारक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नाशिक
सुरेश पवार
अध्यक्ष गिरणा गौरव प्रतिष्ठान नाशिक

